Pune Chandani Chowk Bridge Demolition | चांदणी चौकातील जुना उड्डाणपूल पाडण्यासाठी ड्रिलिंगचे काम सुरू

पुणे : Pune Chandani Chowk Bridge Demolition | चांदणी चौकातील जुना पूल पाडण्याआधी (Pune Chandani Chowk Bridge Demolition) ड्रिलिंग करण्याच्या कामाला सोमवारपासून (12 सप्टेंबर) सुरूवात करण्यात आली. हा पूल पाडण्याचे नियोजन नॅशनल हायवेज ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (एनएचएआय) केले आहे. त्यानुसार पुल पाडण्याआधीची पूर्वतयारी पूर्ण करण्यात आली आहे.

याबाबत बोलताना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Pune Collector Dr. Rajesh Deshmukh) म्हणाले, ‘चांदणी चौकात येणारी जड वाहतूक अन्य मार्गे वळविण्यात आली आहे. श्रृंगेरी मठ, वेदभवन समोरील काम सुरू करण्यात आले आहे. तसेच या चौकात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून १०० पेक्षा जास्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. मुळशी-सातारा दरम्यानचा रस्ताही सुरू करण्यात आला आहे. श्रृंगेरी मठ येथील २७० चौरस मीटर जागा ताब्यात घेऊन काम सुरू करण्यात आले आहे. अशाप्रकारे चांदणी चौकातील जूना पूल पाडण्याच्या आधीची पूर्वतयारी पूर्ण करण्यात आली आहे. एनएचएआयने नियोजन केले असून या आठवड्यात पूल पाडण्याची शक्यता आहे.’

दरम्यान, पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर चांदणी चौकात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ता रुंदीकरणासह विविध कामे हाती घेतली आहेत. त्या अंतर्गत चांदणी चौकातील वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी जुना पूल पाडण्याचे काम नोएडा येथील

ट्विन टॉवर पाडणाऱ्या एका कंपनीला देण्यात आले आहे.
त्यानुसार संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चांदणी चौकात पुलाची पाहणी केली.
हा पूल स्फोटकांच्या साह्याने पाडता येईल का, याची पाहणी अधिकाऱ्यांनी केली आहे.
त्याचा अहवाल प्रशासनाला सादर झाल्यानंतर पूल पाडण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
चालू आठवड्यात पुल पाडण्याची शक्यताही प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Web Title :- Pune Chandani Chowk Bridge Demolition | Drilling work to demolish the old flyover at Chandni Chowk is underway

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Sachin Sawant | ‘सर आली धावून, भाजप ऑफिस गेले वाहून!’, पुण्यातील रस्त्यावर साचलेल्या पाण्यावरुन सचिन सावंतांचा भाजपला खोचक टोला

Ashish Shelar | राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडून राज्य सरकारला 12 हजार कोटींचा दंड, आशिष शेलारांनी साधला आदित्य ठाकरेंवर निशाणा

MLA Ravi Rana | ‘अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंग ठाकरे सरकारसाठी वसूली करत होत्या’; रवी राणांचा गंभीर आरोप