Pune Chandani Chowk Bridge Demolition | चांदणी चौकातील वाहतूक अचानक वळविल्याने पुणेकरांना मनस्ताप

पुणे : Pune Chandani Chowk Bridge Demolition | चांदणी चौकातील पुलावर ड्रिलिंगचे काम करण्यासाठी मंगळवारी सकाळपासून अचानक हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. याबाबत आगाऊ माहिती दिलेली नसल्यामुळे पुणेकरांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. चांदणी चौकातील जुना पूल पाडण्याची तयारी एनएचएआयकडून करण्यात येत आहे.

दिल्ली येथील एका खासगी कंपनीकडून हे काम केले जात आहे. सध्या पूल पाडण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी केली जात आहे. सोमवारपासून जुन्या पुलाच्या खांबांना ड्रिलिंग करून जिलेटिनच्या कांड्या लावण्यात येत आहेत. मंगळवारी देखील हेच काम सुरू होते. या कामासाठी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र, याची पूर्वकल्पना देण्यात आली नाही. त्यामुळे या चौकातून जाणाऱया प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. (Pune Chandani Chowk Bridge Demolition)

दरम्यान, चांदणी चौकातील पूल पाडल्यानंतर वाहतूक कोणत्या मार्गाने वळविली जाणार, याचा आराखडा महामार्ग प्राधिकरणाने मंगळवारी जाहीर केला.
मात्र, जूना पूल पाडताना महामार्ग बराच काळाकरिता बंद ठेवल्यास वाहतुकीत कसा बदल केला जाणार, याचे नियोजन अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

चांदणी चौकातील जुना पूल नेमका कधी पाडणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही.
पूल पाडणाऱ्या कंपनीने आठ दिवसांचा कालावधी मागितला आहे. याबाबत चर्चा सुरू आहे.
समांतर पातळीवर पुलाचा इतर भाग तोडण्याचे काम करण्यात येत आहे.
त्यामुळे पुलावरील वाहतूक बंद केली असून नव्याने बांधलेला पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे.

– संजय कदम, प्रकल्प संचालक, एनएचएआय, पुणे (Sanjay Kadam, Project Director, NHAI, Pune)

Web Title :- Pune Chandani Chowk Bridge Demolition | Pune residents are distressed due to the sudden diversion of traffic at Chandni Chowk

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | हडपसरमध्ये 2 मैत्रिणींची आत्महत्या; एकीने घेतला गळफास तर दुसरीने इमारतीवरुन मारली उडली

Pune PMC-PMRDA | पीएमआरडीएनेच नाले, ओढ्यांवर बांधकाम परवानग्या दिल्याने; समाविष्ट गावांमध्ये ‘पूरस्थिती’ची परिस्थिती ! ; महापालिकेच्या पत्रानंतरही पीएमआरडीए कडून दोन वर्षात कुठलिच कारवाई नाही