भल्या सकाळी घडलेल्या सशस्त्र दरोड्याचा पर्दाफाश, दोघांना अटक तर 3 कोटींचा ऐवज जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – चंदननगरमधील IIFL गोल्ड लोनवर भल्या सकाळी पडलेल्या शशस्त्र दरोड्याचा पोलीसांना छडा लावण्यात यश आले असून, दोघांना अटक करत 3 कोटींचा ऐवज जप्त केला आहे.

दिपक विलास जाधव (वय 32, रा. वाघोली) आणि सनी केवल कुमार (य 29, रा. लोणार गल्ली) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर, त्यांच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यात येत आहेत. याप्रकरणी मनिषा मोहन नायर (वय29) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुणे-नगर रस्त्यावरील भाजी मार्केट परिसरात आनंद इम्पायर इमारतीच्या ग्राऊंड फ्लोअरला आआयएफल गोल्ड लोणेचे कार्यालय आहे. गेल्या आठवड्यात भल्या सकाळीच तिघांनी लोणच्या बहाण्याने आत शिरून पिस्तूलाच्या धाकाने येथे दरोडा टाकला होता. येथून बॅगेत सव्वा चार कोटींचे सोने चोरून नेले होते. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा आणि चंदननगर पोलीस करत होते.

परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली होती. घटनास्थळावरील सीसीटीव्हीत तीघेजन येथून बाहेर पडताना कैद झाले होते. त्यावरून चोरट्यांचा माग काढण्यात येत होता. दरम्यान, चोरट्यांनी या गुन्ह्यात स्विफ्ट कारचा वापर केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, माहिती घेतली असता त्यात दिपक जाधव याने गुन्हा केल्याचे समोर आले.

जाधव हा बुलढाणा येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गजानन जाधव, कर्मचारी अजित धुमाळ, मोहन वाळके, तुषार खडके, तुषार आल्हाट, कृष्णा बुधवंत, प्रदिप सोनवणे, पंडीत गावडे व स्थानिक पोलीसांच्या मदतीने जाधव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हा गुन्हा इतर तीन साथीदारांच्या मदतीने केल्याचे कबूल केले. त्यानंतर सनी केवल कुमार याच्याबाबत माहिती मिळाली. त्यावेळी तो औरंगाबाद येथे असल्याची माहिती मिळाली.

त्यावेळी औरंगाबाद पोलिसांशी संपर्क साधला. औरंगाबाद पोलिसांच्या मदतीने चंदननगर पोलिसांनी त्याला पकडले. दोघांकडून साडे आठ किलो सोन्याचे दागिने आणि कार असा एकूण 3 कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. इतर दोन साथीदांराचा शोध घेण्यात येत आहे.

Visit : Policenama.com