‘चंदगड’ बँकेत 7 कोटींचा घोटाळा झाल्याचा खातेदारांचा आरोप, पुण्यात संतप्त ‘खातेदारांकडून’ बँक कार्यालयाची ‘तोडफोड’
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चंदगड अर्बन निधी बँकेने गरजू खातेदारांना कर्जाचे अमिष दाखवून 7 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे फसवणूक झालेल्या संतप्त खातेदारांनी या बँकेच्या पुण्यातील कार्यालयाची तोडफोड केली. बँकेच्या पुण्यातील केके मार्केटमध्ये चंदगड अर्बन बँकेचे कार्यालय संतप्त खातेदारांनी बंद फोडले. खातेदारांनी बँकेबाहेर गोंधळ घातल्याने या ठिकाणी काहीवेळ तणावाचे वातावरण होते. यावळी बँक संचालक विठ्ठल पेडणेकर हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
बँकेकडून कर्ज मिळणार असल्याने खातेदारांनी व्याजाने पैसे काढून बँकेची पॉलिसी काढली. प्रत्येक खातेदाराने 20 ते 40 हजार रुपये घेऊन बँकेचा संचालक विठ्ठल पेडणेकर फरार झाला. त्याने कोल्हापूर येथेही अशाच प्रकारे फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी पेडणेकर याला तात्काळ अटक करावी अशी मागणी खातेदारांनी केली आहे.
पंजाब नॅशनल बँकेत घोटाळा झाला होता. यामध्ये कोट्यावधी खातेदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाली. हे प्रकरण ताजे असतानाच पुण्यात बँक खातेदारांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.
पंजाब नॅशनल बँकेत काय झाले होते
नीरव मोदी आणि मामा मेहुल चौक्सी या मामा भाच्याने पंजाब नॅशनल बँकेकडून लेटर ऑफ अंडरटेकिंगची सुविधा मिळवली आहे. याच लेटर ऑफ अंडरटेकिंगच्या मदतीने डायमंड आरए, सोलर एक्सपोर्ट, स्टेलर डायमंड्स या तीन कंपन्यांसाठी हाँगकाँगमधील अलाहाबाद बँक, अॅक्सिस बँकेतून पैसे मिळवले आणि 11 हजार कोटींना बँकांना गडा घातला.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- ‘फूड पॉयजनिंग’ कशामुळे होते? ‘ही’ आहेत 5 लक्षणे ?
- ‘फंगल इंन्फेक्शन’ दूर करण्यासाठी ‘या’ 2 प्रकारे करा कडूलिंबाचा वापर !
- मक्याच्या कणीसाचे ‘हे’ आहेत 4 फायदे, मात्र…त्यावर पाणी पीणे नुकसानदायक
- पचनक्रिया बिघडली असेल तर आहारात ‘या’ 7 गोष्टींचा करा समावेश
- तुम्हाला ऑफिसमध्ये सतत झोप येते का? ‘ही’ 4 कारणे असू शकतात !