पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Chandni Chowk News | पुण्यातील चांदणी चौक हा वाहतूक कोंडीचा हॉटस्पॉट आहे. या चौकातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी अनेक उपाययोजना राबवण्यात येत असतात. पुणे – बंगलूरू रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राबवण्यात आलेला चांदणी चौक रस्ता विस्तारीकरण हा प्रकल्प पूर्णत्वाकडे येत असून येत्या १५ जुलैला त्याचे उद्घाटन होणार आहे. गुरुवारी पुण्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Union Road Transport Minister Nitin Gadkari) यांनी या प्रकल्पाचा आढावा घेऊन उर्वरित सर्व कामे जुलै महिन्याच्या १५ तारखेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. (Pune Chandni Chowk News)
गडकरी यांनीच २०१७ साली ऑगस्ट महिन्यामध्ये या प्रकल्पाचे उद्घाटन केले होते. या प्रकल्पांतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण (Road Widening) तसेच एक उड्डाणपूल पाडून नवा बहुमजली उड्डाणपूल (Multi-Storey Flyover) बांधण्याची योजना होती. हा पूल ४ वर्षांत म्हणजे ऑगस्ट २०२१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. गडकरी यांनी स्वत: पुण्यात असताना 1 मे रोजी या पुलाचे उद्घाटन होईल अशी घोषणा केली होती. मात्र, हा मुहूर्त हुकला आणि आता 15 जुलैचा नवा मुहूर्त ठरला आहे.
गुरुवारी पार पडलेल्या आढावा बैठकीस नितीन गडकरी सोबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम (Sanjay Kadam) उपस्थित होते.
या प्रकल्पाबाबत कदम यांनी अधिकची माहिती देत सांगितले की, या पुलाचे दोन्ही बाजूंकडील गर्डर (Girder) टाकण्याचे काम सुरू आहे.
1 जून रोजी मध्यभागातील गर्डर टाकण्याचे काम सुरू होणार आहे.
आता सेवा रस्त्यांचेही (Service Road) काम पूर्ण झाल्याने मध्यभागी टाकण्यात येणाऱ्या गर्डरसाठी वाहतूक थांबविण्याची गरज भासणार नाही.
त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न येणार नाही. गुरुवारी या चौकातील सेवा रस्त्यावरून वाहतूक सुरू केली गेली.
काम 93 टक्के पूर्ण झाले असून उर्वरित 7 टक्क्यांमध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू आहे.
तसेच अन्य कामांमध्ये सुशोभिकरणाची कामे शिल्लक आहेत.
ही कामे शक्य तितक्या लवकर पूर्ण करून त्याचे उद्घाटन 15 जुलैला करण्याचे निर्देश गडकरी यांनी दिले आहेत. (Chandni Chowk News)
Web Title :Pune Chandni Chowk News | Chandni Chowk will reduce traffic congestion; Gadkari’s orders, the project will be inaugurated on July 15
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा