
Pune Chandni Chowk News | चांदणी चौकासंदर्भात आणखी एक मोठा निर्णय, रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी पूल उभारणार
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पश्चिम पुण्याचे प्रवेशद्वार असलेल्या चांदणी चौक (Pune Chandni Chowk News) प्रकल्पाचे लोकार्पण काही दिवसांपूर्वी करण्यात आले आहे. या नवीन पुलामुळे चांदणी चौकातील (Pune Chandni Chowk News) वाहतूक कोंडीचा (Traffic Jam) प्रश्न सुटला आहे. मात्र पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे या ठिकाणी चार किलोमिटर लांबीचा पादचारी मार्ग करण्याचे नियोजन केले आहे. पादचारी मार्गाबरोबरच पादचारी पूल ही उभारला जाणार असून, त्याबाबतचा आराखडा महापालिकेकडून (Pune Municipal Corporation (PMC) तयार करण्यात आला आहे. पुणे महानगरपालिका आणि राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधिकरण National State Highway Authority (NSHA) यांच्यात होणाऱ्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे.
चांदणी चौकातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. या उड्डाणपुलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र या उड्डाणपुलामुळे रस्ता ओलांडण्यास असंख्य अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे याबाबतचा आराखडा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
पुणे महापालिकेने यासाठी चांदणी चौकाचा (Pune Chandni Chowk News) अभ्यास करुन समस्या आणि सुधारणा
याचा आराखडा तयार केला आहे. पालिकेने पादचारी मार्ग बांधण्यासाठी 15 कोटी तर महामार्ग प्राधिकरणाला
पूल बांधण्यासाठी 10 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे. यासाठी एकूण 25 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
चांदणी चौक परिसरातील रस्त्यावर पादचारी मार्ग बांधणे, महामार्ग ओलांडण्यासाठी पादचारी पुलाची उभारणी करणे,
पादचारी पुलावर ये-जा करण्यासाठी जीने, बावधन ते कोथरूड या दरम्यान महामार्गालगत समांतर पादचारी पूल,
वेद भवनाच्या जवळ रस्ता ओलांडण्याची सुविधा असा आराखडा महापालिकेने तयार केला आहे.
यासंदर्भात पालिका आणि महामार्ग प्राधिकरणाची पुढील काही दिवसांत एकत्रित बैठक होणार आहे.
महापालिकेने त्यांच्या हिश्शाला येणाऱ्या खर्चाचा निधी देण्याची भूमिका घेतली आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update