×
Homeताज्या बातम्याPune Chandni Chowk | 1 व 2 ऑक्टोबरला चांदणी चौकातील वाहतुकीत बदल,...

Pune Chandni Chowk | 1 व 2 ऑक्टोबरला चांदणी चौकातील वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी रस्ते

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई- बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai-Bangalore National Highway) पुणे शहरातील चांदणी चौक (Pune Chandni Chowk) पूल येत्या 1 व 2 ऑक्टोबरदरम्यानच्या (शनिवार-रविवार) मध्यरात्री नियंत्रित स्फोट करून पाडण्यात येणार आहे. त्यासाठी 1 ऑक्टोबर रोजी रात्री 11 ते 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक पूर्णत: बंद (Traffic Stop) करण्यात येणार आहे. या दरम्यान चांदणी पुलावरुन (Pune Chandni Chowk) होणाऱ्या वाहतुकीत बदल करण्यात आल्याची माहिती पुणे वाहतूक शाखेचे (Pune Traffic Branch) पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे (DCP Rahul Srirame) यांनी दिली आहे.

चांदणी पुलावरील (Pune Chandni Chowk) वाहतूक रात्री 11 वाजता वाहतूक बंद केल्यानंतर सुमारे पहाटे 2 वा. स्फोटकांद्वारे ब्लास्ट करण्यात येणार आहे. वाहतूक बंद कालावधीत मुंबईकडून येणारी जड वाहने उर्से पथकर नाका येथे थांबवण्यात येणार असून साताराकडून मुंबईकडे येणारी वाहने खेड शिवापूर पथकर नाका (Khed-Shivapur Toll Plaza) येथे थांबवण्यात येणार आहेत. या दरम्यान पोलिसांकडून (Pune Police) हलक्या वाहनांसाठी पर्यायी मार्गाचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच मुंबई बेंगळुरू महामार्गावरील डुक्कर खिंड ते घोडावत चौक (पिंपरी चिंचवड आयुक्तालय-Pimpri Chinchwad Commissionerate) या दरम्यान दोन्ही बाजुने सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूनक बंद करण्यात येणार आहे.

मुंबईकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या हलक्या व प्रवासी चारचाकी वाहनांसाठी पर्यायी मार्ग

– मुंबईकडून येणारी हलकी व प्रवासी चारचाकी वाहने उर्से टोलनाका (Urse Toll Plaza) येथून जुन्या पुणे मुंबई रस्त्याने (Old Pune Mumbai Road) भक्ती शक्ती चौक, नाशिक फाटा, बोपोडी चौक, इंजिनिअरींग कॉलेज चौक, संचेती चौक, खंडोजीबाबा चौक, टिळक रोडने जेधे चौक, पुणे सातारा रोडने कात्रज चौक, सरळ जुना कात्रज बोगदामार्गे साताऱ्याकडे किंवा कात्रज चौक, नवले पुल डावीकडे वळून मुंबई-बेंगलुरु राष्ट्रीय महामार्ग

– वाकड चौक डावीकडे वळून राजीव गांधी पुलावरुन (Rajiv Gandhi Bridge) विद्यापीठ चौक (Vidyapeeth Chowk), संचेती चौक, उजवीकडे वळून खंडोजीबाबा चौक, टिळक रोडने जेधे चौक, पुणे सातारा रोडने (Pune Satara Road) कात्रज चौक, सरळ जुना कात्रज बोगदामार्गे साताऱ्याकडे किंवा कात्रज चौक, नवले पुल डावीकडे वळून मुंबई-बेंगलुरु राष्ट्रीय महामार्ग

– राधा चौक डावीकडे वळून बाणेर रोडने विद्यापीठ चौक, उजवीकडे वळून संचेती चौक,
उजवीकडे वळून खंडोजीबाब चौक, टिळक रोडने जेधे चौक, पुणे सातारा रोडने कात्रज चौक,
सरळ जुना कात्रज बोगदामार्गे साताऱ्याकडे किंवा कात्र चौक, नवले पुल डावीकडे वळून मुंबई-बेंगलुरु राष्ट्रीय महामार्ग

साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या हलक्या व प्रवासी चारचाकी वाहनांसाठी पर्यायी मार्ग

– खेड शिवापूर टोलनाका, शिंदेवाडी, जुना कात्रज बोगदा, कात्रज चौक, पुणे सातारा रोडने जेधे चौक,
डावीकडे वळून सारसबाग, पुरम चौक, डावीकडे वळून टिळक रोडने खंडोजीबाबा चौक,
फर्ग्युसन रोडने विर चाफेकर चौक, डावीकडे वळून विद्यापीठ चौक, राजीव गांधी पुलावरुन औंध वाकड रोड ने
वाकड चौक, डावीकडे वळून पुढे यू टर्न घेऊन मुंबई-बेंगलुरु राष्ट्रीय महामार्ग

– (Khed-Shivapur Toll Plaza) खेड शिवापूर टोलनाका, शिंदेवाडी, जुना कात्रज बोगदा, कात्रज चौक,
डावीकडे वळून नवले पुल, वडगांव पुल अंडरपास, सिंहगड रोडने राजाराम पुल, डी.पी. रोडमार्गे नळस्टॉप,
लॉ कॉलेज रोड, सेनापती बापट रोड, विद्यापीठ चौक, राजीव गांधी पुलावरुन औंध वाकड रोडने वाकड चौक,
डावीकडे वळून पुढे यू टर्न घेऊन मुंबई-बेंगलुरु राष्ट्रीय महामार्ग

– खेड शिवापूर टोलनाका, शिंदेवाडी, जुना कात्रज बोगदा, कात्रज चौक, डावीकडे वळून नवले पुल, वडगांव पुल,
वारजे पूल अंडरपास, आंबेडकर चौक, वनदेवी चौक, कर्वे पुतळा चौक, नळस्टॉप, लॉ कॉलेज रोड, सेनापती बापट रोड,
विद्यापीठ चौक, राजीव गांधी पुलावरुन औंध वाकड रोडने वाकड चौक, डावीकडे वळून पुढे यु टर्न घेऊन मुंबई-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग

Web Title :- Pune Chandni Chowk | Traffic changes in Chandni Chowk on 1st and 2nd October, Know alternative routes

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kolhapur ACB Trap | भविष्य निर्वाह निधीची रक्कम देण्यासाठी 25 हजार रुपये लाच मागणाऱ्या लिपिकावर एसीबीकडून FIR

Pune Crime | ‘त्या’ प्रकरणात बारामतीचे तत्कालीन DySP नारायण शिरगावकर आणि पो. नि. भाऊसाहेब पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश; सध्या पुणे शहर गुन्हे शाखेत कार्यरत असलेले ACP शिरगावकार म्हणाले….

Pune Yevlewadi DP | येवलेवाडीचा विकास आराखडा जागांची मालकी पाहूनच केल्याची जोरदार चर्चा; भूसंपादन झालेले नसतानाही कात्रज-कोंढवा रस्ता – टिळेकरनगर – पानसरेनगर डी.पी. रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News