PM मोदींच्या दौर्‍यामुळे पुण्यातील वाहतूकीत बदल ! टिळक रोड व लाल बहादुर शास्त्री रोडवर 12 तासांसाठी ‘नो-पार्किंग’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (दि. 17) पुणे दौर्‍यावर असून त्यांची एस.पी. महाविद्यालयाच्या मैदानावर सभा होणार आहे. त्यामुळे वाहतूक शाखेकडून शहरातील वाहतूक व्यवस्थेत काही बदल करण्यात आले आहेत. नागरिकांनी सभेच्या परिसरातून प्रवास करण्यासाठी खासगी वाहने टाळावीत असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज देशमुख यांनी केले आहे.

वाहतूकीतील बदली पुढील प्रमाणे –

1. डेक्कन येथील खंडोजीबाबा चौकातून संभाजी पुलाकडे न जाता उजवीकडे वळून कर्वेरोडने इच्छितस्थळी जावे.
2. दांडेकर पुलाकडून अलका टॉकीजकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी सावरकर चौक आणि मित्रमंडळ चौक मार्गे इच्छितस्थळी जावे.
3. स्वारगेट, सारसबाग येथून टिळक रोडला जाणारी वाहतूक पुरम चौकातून बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे चालकांनी बाजीराव रोडने इच्छितस्थळी जावे.
4. शाहु पुल – दत्तवाडी – जनता वसाहत – पर्वती पायथ्याकडून येणार्‍या वाहनांनी डावीकडे वळून नाथ पै चौक, एस.पी. कॉलेजकडे जाऊ नये. त्यांना जाता येणार नाही. या वाहन चालकांनी उजवीकडे वळून कल्पना हॉटेल, सणस पुतळ्याकडून इच्छितस्थळी जावे.
5. सणस पुतळा, कल्पना हॉटेलकडून येणार्‍या वाहन चालकांनी ना.सी. फडके चौकातून सरळ नाथ पै चौकाकडे जाऊ नये. त्यांना जाता येणार नाही. तसेच, डावीकडे वळून एस.पी. कॉलेज चौकाकडे जाता येणार नाही. चालकांनी केवळ शाहु पुलाकडे अथवा सिंहगड रोडने इच्छितस्थळी जावे.

10 ठिकाणे पार्किंगसाठी
PM नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या आयोजकांकडून येणारे कार्यकर्त्यांसाठी या भागातील दहा ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात गणेश कला क्रिडा, न्यु इंग्लिश स्कूल, महाराष्ट्र मंडळ, रमणबाग, न. रा. हायस्कूल यासह इतर ठिकाणी आहेत. त्याची माहिती आयोजकांकडून देण्यात येणार आहे.

महत्वाचे
1. टिळक रोड आणि लाल बहादुर शास्त्री रोड उद्या दु. 12 ते रात्री 12 वाजेपर्यंत कुठल्याही प्रकारची पार्किंग करता येणार नाही. समांतर पार्किंग आणि पी – 1 आणि पी 2 पार्किंग देखील नाही.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी