ख्रिसमसनिमित्त शहरातील वाहतूकीत बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ख्रिसमस सणानिमित्त लष्कर परिसरातील वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. या परिसरात त्यातही महात्मा गांधी रस्त्यावर नागरिकांची मोठ्या प्रमाणवर गर्दी होते. त्यामुळे परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे पोलीसांच्या वाहतूक विभागाने वाहतूक बदल केला आहे. बुधवारी (दि. 25) संध्याकाळी सातनंतर हा बदल असेल. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरु यांनी केले आहे.

असा आहे बदल…
1) गोळीबार मैदान चौकातून एमजी रस्त्याने आणि पुलगेटकडे जाणारी वाहतूक 15 ऑगस्ट चौकात बंद असेल.

2) इस्कॉन मंदीर चौकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक बंद करुन एसबीआय हाउसकडे वळविली आहे.

3) व्होल्गा चौकातून महमंद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद असणार असून, इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात आली आहे.

4) इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद असेल. ही वाहतूक लष्कर पोलिस चौकातून वळविली जाईल.

5) सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करुन ती ताबुत स्ट्रीटमार्गे वळविण्यात आली आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/