Pune : ‘रोज रात्री सारखे कोणाशी चॅटिंग करता; आमच्याशी का नाही बोलत’; पतीकडून पत्नी आणि मुलीला बेदम मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – “रोज रात्री सारखे कोणाशी चॅटिंग करता; आमच्याशी का नाही बोलत” अशी विचारणा करणाऱ्या पत्नी व मुलाला पतीने बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील बिबवेवाडी परिसरात ही घटना घडली आहे.

या प्रकरणी कुणाल शेखर चांदेकर (वय 35) या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पत्नीने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाम्पत्य येथील विघ्नहरनगर परिसरात राहतात. त्यांना एक मुलगा आहे. शुक्रवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास कुणाल चांदेकर हे मोबाईलवर चॅटिंग करत होते. यावेळी फिर्यादी यांनी “तुम्ही एवढ्या रात्री रोज कोणाशी चॅटिंग, करता आमच्याशी का नाही बोलत” अशी विचारणा केली. याचा राग शेखर यांना आला.

त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ करून कमरेचा पट्ट्याने व लाकडी बांबूने मारहाण केली. यात त्या जखमी झाल्या आहेत. तर त्यांना मारून टाकण्याची धमकी दिली. फिर्यादी यांचा मुलगा भांडण सोडण्यास आला. त्यालाही शिवीगाळ करून मारून टाकण्याची धमकी दिली.