नोकरीच्या बहाण्यानं तिघांकडून दीड लाख उकळले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नोकरी लावण्याच्या बहाणाकरून तीन तरुणांकडून सायबर चोरट्यांनी दीड लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑक्टोंबर 2019 मध्ये हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी श्रीकांत उकीरडे (वय 26, रा. कात्रज) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत हा उच्चशिक्षीत आहे. त्याला नोकरीची आवश्यक्ता होती. त्याच्यासोबतच इतर दोन मित्रांनाही नोकरीची गरज होती. यादरम्यान, आरोपींनी फिर्यादींशी संपर्क साधला. तसेच, अस्थित्वात नसणार्‍या ऑप्रेटिक टेक्नॉलॉजी कंपनीत डेटा हुडूप व जावा डेव्हलपर्स या पदावर नोकरी लावण्याचे अमिष दाखवून तिघांचा विश्वास संपादन केला. त्यांना काही पैसे द्यावे लागतील असे सांगत तिघांकडून एकूण दीड लाख रुपये उकळले. त्यांना नोकरी लावल्याचे बनावट कागदपत्रे पाठविली. त्यांनी या कंपनीबाबत चौकशी केल्यानंतर अशी कोणतीच कंपनी नसल्याचे लक्षात आले. त्यावेळी त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलीसांकडे तक्रार दिली. अधिक तपास वारजे पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like