ऑनलाइन कार पाहणे पडले महागात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सेकंड हँड कार खरेदी करण्यासाठी कारवालेडॉटकॉम या साईटवर पाहणी करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले असून, गोपनीय माहिती घेऊन 1 लाख रुपयांना गंडा घालण्यात आला आहे.

याप्रकरणी मनिष कुमार (वय 36, रा. लोहगाव) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एका खासगी कंपनीत नोकरीस आहेत. त्यांना कार खरेदी करायची होती. त्यामुळे त्यांनी कारवालेडॉटकॉम या साईटवर जाऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांना अडीच लाख रुपये किंमत दिलेली टाटा किसान कार आवडली. यामुळे त्यांनी गुगल सर्च करून क्रमांकवर संपर्क साधला. त्यावेळी आरोपीने मी मोटर्स डिलरमधून बोलत असल्याचे सांगत विश्वास संपादन केला. तसेच, युपीआय लिंक व पीन शेअर करण्यास भाग पाडून त्यांच्या खात्यातून 1 लाख रुपये ट्रान्सफर करून फसवणूक केली. अधिक तपास विमानतळ पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/

You might also like