गिफ्टच्या आमिषाने महिलेला लाखोंचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – विवाह संकेतस्थळावर ओळख झाल्यानंतर लग्न करण्याचे अमिष दाखवून महिलेला महागडे गिफ्ट पाठविल्याचे सांगत साडे आठ लाख रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जून 2019 ते 18 जानेवारी या कालावधीत ही घटना घडली आहे.

याप्रकरणी एका महिलेने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला एका खासगी कंपनीत नोकरीस आहेत. त्यांनी स्वतःचे लग्न जमविण्यासाठी मेट्रोमॉनी विवाह नोंदणी वेबसाईटवर नावनोंदणी केली होती. त्यानंतर एका सायबर चोरट्याने महिलेशी संपर्वै साधून लग्नाचे आमिष दाखविले. त्याने महिलेशी ओळख वाढवून गिफ्ट पाठविल्याची बतावणी केली. त्यानंतर गिफ्टचा फोटो मोबाईलवर पाठविल्याने महिलेचा विश्वास बसला. मात्र, गिफ्ट मिळविण्यासाठी सायबर चोरट्याने महिलेला विविध कर जमा करण्यास सांगितले. त्यानुसार गिफ्टच्या आमिषाने महिलेने वेगवेगळ्या बँक खात्यात ऑनलाईनरित्या 8 लाख 20 हजार रुपये जमा केले. रक्कम जमा करुनही गिफ्ट मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर महिलेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधील पंधरकर अधिक तपास करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like