परदेशात नोकरीच्या आमिषानं 2 लाखांचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  परदेशात नोकरी लावण्याच्या बहाण्याने एकाला सायबर चोरट्यांनी 2 लाख रुपयांना गंडा घातला. 22 जून ते 7 जुलै 2020 या कालावधीत हा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी 42 वर्षीय व्यक्तीने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आयटी ऍक्ट व फसवणूकीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे धायरी परिसरात राहण्यास आहेत. ते खासगी कंपनीत नोकरी करतात. दरम्यान त्यांना जून महिन्यात एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला होता. त्याने फिर्यादी यांना परदेशात चांगल्या पगाराची नोकरी लावतो असे म्हणून विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्याकडून बेल्जियम एम्बेसीला तसेच इतर कारणासाठी पैसे भरण्यास सांगत 1 लाख 92 हजार रुपये भरण्यास भाग पाडले. तसेच त्यांनी पैसे भरल्यानंतर देखील नोकरी न लागल्याने त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक बर्गे हे करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like