Pune : कर्जाच्या आमिषाने महिलेची फसवणूक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पतसंस्थेतून कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलेला सायबर चोरट्यांनी 30 हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी 51 वर्षीय महिलेने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी यांच्या मोबाइलवर शनिवारी (15 ऑगस्ट) एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. त्याने खासगी पतसंस्थेतून बोलत असल्याचे सांगितले. त्यांना त्वरीत कर्ज मंजुर करून देतो. कर्ज मंजुरी प्रक्रियेसाठी केवळ 10 रुपये शुल्क आकारण्यात येणार असल्याची बतावणी केली व महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर महिलेला एक लिंक पाठविली. तसेच त्यावर या माहिती भरण्यास सांगितले. महिलेने नाव तसेच बँक खात्याची गोपनीय माहिती भरल्यानंतर खात्यातून ३० हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफरकरून फसवणूक केली. अधिक तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे हे करत आहेत.