Paytm अपडेट करण्याच्या बहाण्याने फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पेटीएमचे केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने एका महिलेला 10 हजाराला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. तर शहरातील सायबर फसवणुकीचे सत्र सुरूच आहे. याप्रकरणी एका ३७ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात आयटी अक्टनुसार सिहंगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर परिसरात रहायला आहेत. 6 मे रोजी त्या घरी होत्या. त्यावेळी आरोपीचा त्यांना फोन आला. त्याने पेटीएममधून बोलत असल्याचे सांगितले. पेटीएमचे केवायसी अपडेट करावे लागेल, अन्यथा पेटीएम बंद होईल, असे सांगितले. पेटीएम अपडेट करण्यासाठी टीम व्हिव्हर हे अ‍ॅप घेण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी ते अ‍ॅप घेतले. त्या अपच्या माध्यमातून आरोपीने मोबाईलमध्ये असलेली सर्व बँक खात्याची माहिती घेतली. त्या माहितीच्या आधारे त्यांच्या खात्यामधून 10 हजार 499 रुपये काढून घेतले. पैसे काढल्याचा एसएमएस आल्यानंतर फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. अधिक तपास सिंहगड रोड पोलिस करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like