थ्रीडी प्रिंटर विक्रीच्या बहाण्याने 42 हजार उकळले गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   थ्रीडी प्रिंटर विक्री करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी विद्यार्थ्यांकडून ४२ हजार उकळले.

गोकुळ विश्वनाथन (वय २०, रा. विमाननगर ) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोकुळ एका नामांकित महाविद्यालयात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. थ्रीडी प्रिंटर विकत घ्यायचा असल्याने त्याने ऑनलाईनरित्या चौकशीत केली. त्यावेळी एकाने गोकुळला संपर्क केेला.

तसेच व्हॉट्सअ‍ॅपला थ्रीडी प्रिंटरचे फोटो पाठविले. त्यानुसार गोकुळने एका प्रिंटरची निवड केली . त्यानंतर सायबर चोरट्याने त्याला ऑनलाईनरित्या रक्कम जमा केल्यानंतर प्रिंटरची डिलीव्हरी करणार असल्याचे सांगितले. त्यानुसार गोकुळने थ्रीडी प्रिंटरसाठी वेळोवेळी ४२ हजार रुपये जमा केले. रक्कम जमा करुनही थ्रीडी प्रिंटर न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे गोकुळच्या लक्षात आहे. त्यानंतर त्याने पोलिसाकडे तक्रार दिली. अधीक तपास विमानतळ पोलीस करत आहेत.