पुण्यात फ्लॅटधारकाची 1 कोटी 18 लाखाची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बांधकाम नियंत्रक कार्यालयाचे बनावट शिक्के तयार करून त्या आधारे बोपोडी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात अनाधिकृत फ्लॅट व दुकाने खरेदीचा दस्त तयार केले. तसेच फ्लॅट धारकांची 1 कोटी 18 लाख 50 हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी काशिनाथ जाधव (46, रा. कळस) यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार किशोर विश्वास पाटील (वय 42) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळस येथील फेज 11, सर्व्हे नंबर 24/1,ए/1/3 येथील सैनिक रेसिडेन्सीमधील फिर्यादी व फ्लॅट व दुकानधारकांना आरोपीने पुणे महापालिकेच्या बांधकाम कार्यालयातील बांधकाम नियंत्रक कार्यालयाचे बनावट शिक्के व बनावट स्वाक्षरी असलेले बनावट दस्ताऐवज दाखविले. त्याआधारे फिर्यादी व साक्षीदारांचा विश्वास संपादन करून बोपडी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात अनधिकृत फ्लॅट व दुकानांचा दस्त तयार केला. आधारे त्यांने फिर्यादी आणि इतरांची 1 कोटी 18 लाख 50 हजारांची फसवणूक केली. फिर्यादी इतर जणांचीही आरोपीने फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. बनावट कागदपत्रे तयार करून ती कागदपत्रे उपयोगात आणले आहे, असे फिर्यादीत म्हंटले आहे. अधिक तपास खडकी पोलीस करत आहेत.