Pune : मोबाईल खरेदीच्या बहाण्याने तरुणीला सव्वा लाखांचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   मोबाईल खरेदी करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्याने तरुणीला १ लाख २० हजारांचा गंडा घातला.

याप्रकरणी २१ वर्षीय तरुणीने शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. त्यानुसार आयटी ऍक्टनुसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीने ओएलएक्स वेबसाईटवर मोबाईल विक्रीसाठी जाहिरात दिली होती. सायबर चोरट्याने तरुणीला संपर्क साधला. तसेच तिचा विश्वास संपादित केला. जादा किमतीचे आमिष दाखविले. तरुणीने संबंधिताने दिलेल्या पत्त्यावर मोबाईल पाठवून दिला. त्यानंतर ३० हजार रुपयेही पाठवून दिले. मात्र, त्यानंतर सायबर चोरट्याने संपर्क बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे करीत आहेत.