Pune : Google Pay कडून पैसे मिळणार असल्याचं सांगत महिलेची सव्वा लाखाची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गुगल पे कडून पैसे परत मिळणार असल्याचे सांगत एका महिलेला सायबर चोरट्यांनी सव्वा लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी खराडी येथील ३८ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाईल धारक व्यक्तीवर चंदननगर पोलिस ठाण्यात आयटी अक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला १० ऑगस्ट रोजी एका व्यक्तीचा फोन आला. त्याने गुगल पेकडून तुम्हाला पैसे परत दिले जाणार आहेत, असे सांगितले. फिर्यादी गुगल पे अकाउंट वापरत असल्याने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. महिलेला आरोपीने टीम व्हीव्हर क्वीक सपोर्ट अप डाऊनलोड करायला सांगितले. त्यानुसार महिलेने ते अप डाऊनलोड केले. यानंतर आरोपीने त्यांच्या बँक खात्याची डिटेल्स चोरली. त्यांच्या वेगवेगळ्या बँक खात्यामधून 1 लाख २२ हजार रूपये दुसऱ्या खात्यावर वळविले. तसेच त्यांना बँकेच्या खात्यामधून पैसे कमी झाल्याच्या मेसेज आला. त्यानंतर त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. अधिक तपास चंदननगर पोलिस करत आहेत.