Pune : Paytm द्वारे पैसे ट्रान्सफरकरून 1.5 लाखांची फसवणूक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरात सायबर गुन्ह्यांची व्याप्ती वाढत असून, सायबर चोरट्यांनी पेटीएमद्वारे परस्पर दीड लाख रुपये ट्रान्सफरकरून एकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. जून महिन्यात हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी हमीद शेख (वय 32, रा. येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाईल धारकविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खासगी नोकरीस करतात. ते पेटीएमचा वापर करतात. दरम्यान जून महिन्यात त्यांच्या बँक खात्यातून पेटीएमच्या माध्यमातून सायबर चोरट्यांने वेळोवेळी तीन ट्रांझेक्शन करून 1 लाख 45 हजार रुपये ट्रान्सफर केले. त्यावेळी फिर्यादीना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास येरवडा पोलीस करत आहेत.