कापूर तयार करण्याचे मशीन विकत देण्याच्या बहाण्याने सव्वा दोन लाख रुपयांना गंडा

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुण्यातील एकाला कापूर तयार करण्याचे मशीन विकत देण्याच्या बहाण्याने सव्वा दोन लाख रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी सागर गोयल (वय २३, रा. नाना पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार नागपूर येथील व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना कापूर बनविण्याची मशीन विकत हवी होती. त्यांनी आरोपीशी मोबाईल संपर्क साधला. त्याला मशीनची ऑर्डर दिली होती. त्यासाठी ऑनलाईन २ लाख २० हजार रुपये पाठविले. पण, आरोपीने त्यांना ठरल्याप्रमाणे मशीन दिली नाही. त्यामुळे त्यांनी ती ऑर्डर रद्द करून पैसे परत मागितले. पण, आरोपीने त्यांना पैसे परत केले नाही. तसेच, मशीन देखील दिले नाही. त्यानंतर फिर्यादीनी पोलिसांकडे धाव घेतली. अधिक तपास सहायक निरीक्षक परवेझ शिकलगार हे करत आहेत.