पुण्याच्या रविवार पेठेतील सराफी व्यावसायिकाला 1 कोटींचा गंडा

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – रविवार पेठेतील एका सराफी व्यावसायिकाचे 1 कोटींचे सोन्याचे दागिने घेऊन कारागिर पसार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सर्व कारागिर पश्चिम बंगाल येथील आहेत.
याप्रकरणी दिनेश पावटेकर (रा. 432, रविवार पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पावटेकर सराफी व्यावसायिक आहेत. त्यांचे रविवार पेठेत दुकान आहे. ग्राहकांनी सोने खेरदी केल्यानंतर त्यांना पाहिजे ते डिझाईन बनवून देतात. हे डिझाईन बनविण्याचे काम आरोपी कामगार करत असे. गेल्या दोन वर्षांपासून त्यांची ओळख होती. त्यामुळे पावटेकर यांचा विश्वास बसला होता. सर्व कामगार पश्चिम बंगाल येथील आहेत. दरम्यान, त्यांच्याकडे ग्राहकांनी खरेदीकरून डिझाईनसाठी दिलेले सोने कामगारांकडे दिले होते. मात्र, कामगार दिलेले 270 ग्रॅम सोने घेऊन पसार झाले आहेत. दोन दिवसांर्पुी त्यांना कामगिर पसार झाल्याचे समजल्यानंतर त्यांनी पोलीसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक सुर्यवंशी करत आहेत.