Pune : तरुणीला App डाऊनलोड करायाला लावून 1 लाख रुपयांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जिओचे सीम बंद होणार असल्याची भिती दाखवत तरुणीला ॲप डाऊनलोड करायाला लावून 1 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात 27 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीला जून महिन्यात एका व्यक्तीचा फोन आला. तुमचे जिओचे सीम बंद होणार आहे. ते सुरू ठेवण्यासाठी गुगल पेवरून क्युआर कोडच्या माध्यमातून एक रुपया पाठवा. त्यानंतर त्यांच्याशी गप्पा मारून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर क्युआर कोड सपोर्ट नावाचे ॲप डाऊनलोड करायला सांगितले.

त्यानंतर त्याच्या माध्यमातून तरुणीच्या एचडीएफसी बँक खात्यामधून क्युआरकोडच्या माध्यमातून ९९ हजार ९६९ रूपये ऑनलाईन काढून घेतले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी चौकशी करून वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक अमृत मराठे हे करत आहेत.