सायबर भामट्यांनी ‘लिंक’ पाठवून घातला एक लाखाचा ‘गंडा’

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – वाहन परवान्याची मुदत संपल्याने गुगलवर पुणे आरटीओ सर्चकरून त्यावर दिलेल्या एका क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर सायबर चोरट्यांनी एक लिंक पाठवून तरुणाला एक लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी चातुशृंगी पोलीस ठाण्यात 41 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पाषाण परिसरात राहण्यास आहेत. ते एका खासगी कंपनीत काम करतात.
दरम्यान त्यांच्या वाहन परवान्याची मुदत संपली होती.

त्यामुळे त्यांना याबाबत अधिक माहिती पाहिजे होती. त्यासाठी त्यांनी गुगलवर जाऊन पुणे आरटीओ असे टाकून सर्च केले. त्यावेळी आलेल्या एका क्रमांकावर सम्पर्क साधला. त्यावेळी त्या व्यक्तीने फिर्यादी यांना मोबाईल एक लिंक पाठवली. तसेच ती उघडण्यास सांगतीले. त्यांनी लिंक उघडल्यानंतर त्यांच्या खात्यावरून 4 वेळा ट्रांझेक्शन होऊन 1 लाख रुपये ट्रान्सफर झाले असता त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यावेळी त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. त्याची प्राथमिक चौकशी करण्यात आली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.