परस्पर वस्तूंची विक्री करीत नोकराचा मालकाला 19 लाखांचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दुकानातील कामागरानेच मालकाच्या परस्पर साहित्याची विक्रीकरून त्याची रक्कम न देता तब्बल 19 लाख रुपयांना गंडा घातला आहे. इनव्हर्टर, बॅटरी, सीसीटीव्ही, कॉम्प्युटरचीची विक्री केली आहे. 1 जून ते 30 नोव्हेंबर या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

मनेश चांदरवार (वय 30, रा. भवानी पेठ) असे नोकराचे नाव आहे. याबाबत दुकानादार निबजिया यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निबजिया यांचे भवानी पेठेत ब्ल्यू पाईंट पॉवर नावाने इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीचे दुकान आहे. दुकानामध्ये मागील वर्षभरापासून मनेश काम करत होता. त्यामुळे त्याच्यावर फिर्यादींचा विश्वास बसला होता. दुकानातील विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू ग्राहकांना 40 दिवसांच्या उधारीवर विक्री करण्याची परवानगी मनेजशला होती. त्याचा फायदा घेत मनेशने 1 जून ते 30 नोव्हेंबर कालावधीत दुकानातील सीसीटीव्ही, इनव्हर्टर बॅटरी, कॉम्प्युटरची विक्री केली. त्यातून मिळालेली 19 लाखांची रक्कम दुकानाचे मालक निबजिया यांना दिली नाही. त्यामुळे वस्तू विक्रीची रक्कम न मिळाल्याने फसवणूक झाल्याने निबजिया यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी अधिक तपास करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like