पुण्यात कर्जाच्या आमिषानं 6 महिलांना 2 लाखांचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शहरातील 6 महिलांचे कागदपत्र घेऊन त्यांच्या नावावर टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन घेउन १ लाख ८६ हजारांचा गंडा घातला. जून २०१९ ते मार्च २०२० कालावधीत घडली आहे.

याप्रकरणी एका ३० वर्षीय महिलेने खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेसह सहाजणीना कर्ज घ्यायचे होते. त्याचा गैरफायदा घेउन खडकीतील मानाजी बाग परिसरात दोघांनी त्यांना कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी महिलांची विविध कर्जाच्या कागदपत्रांवर सह्या घेतल्या. त्यानंतर आरोपींनी महिलांच्या नावे टीव्ही, फ्रीज, वॉशिंगमशीन घेउन त्यांची १ लाख ८५ हजारांची फसवणूक केली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक कोळी अधिक करत आहेत.