IT रिफंड देण्याच्या बहाण्याने तीन लाखाला गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महिलेला व्हॉट्सअपवर इनकम टॅक्स रिफंडची लिंक पाठवून त्यांना गोपनीय माहिती भरण्यास भाग पाडत त्याआधारे खात्यावरून तीन लाख रुपये ट्रान्सफर करून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी राजेंद्र कुलकर्णी (वय 54, रा. पर्वती, सिंहगड रोड) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींच्या मोबाईलवर अज्ञातांनी इनकम टॅक्स रिफंड मिळणारी एक लिंक पाठविली. त्यानंतर त्यांना रिफंड मिळविण्यासाठी एक फॉर्म भरण्यास सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यात बँकेची तसेच वैयक्तीक माहिती भरण्यास सांगितले होते. त्यानुसार, फिर्यादींच्या पत्नीने त्यात माहिती भरली. त्यावेळी सायबर चोरट्यांनी त्यांच्या खात्यावरून 2 लाख 94 हजार रुपये ट्रान्सफर केले. त्यावेळी त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. अधिक तपास दत्तवाडी पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –