लॉटरीच्या बहाण्यानं पुण्यातील तरूणीला 4 लाखाला गंडवलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  लॉटरी लागल्याच्या बहाण्याने सायबर चोरट्याने तरुणीला सव्वा चार लाखाला गंडा घातला आहे. 18 एप्रिल ते 12 मे 2020 या कालावधीत घडला आहे.

याप्रकरणी एका तरुणीने अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी जोतिष अंकशास्त्र तज्ज्ञ आहेत. कोथरुड भागात राहतात. १८ एप्रिलला सायबर चोरट्याने तरुणीला फोन करुन २५ लाखांची लॉटरी लागल्याची बतावणी केली. त्यासाठी लॉटरीचे बनावट प्रमाणपत्र तरुणीला पाठवून दिले. त्यामुळे त्यांचा विश्वास बसला. लॉटरीचे पैसे मिळविण्यासाठी विविध कारणे सांगून चोरट्याने तरुणीला वेळोवेळी बँकखात्यात रक्कम भरायला सांगितली. त्यानुसार तरुणीने ४ लाख १५ हजार रुपये सायबर चोरट्याने सांगितलेल्या बँकखात्यात जमा केले. रक्कम जमा करुनही लॉटरीचे पैसे न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेश तटकरे करीत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like