वृत्तपत्रातील कर्जाची जाहिरात पाहून घालविले 45 हजार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – वृत्तपत्रात कर्जाची जाहिरात पाहिल्यानंतर गरजवंत महिलेने त्या क्रमांकावर संपर्क साधला. परंतु, अज्ञाताने वेगवेगळे कारणे सांगून महिलेची 45 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी येरवडा परिसरात राहणार्‍या 51 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना पैशांची आवश्यक्ता होती. त्यासाठी त्या कर्ज घेण्याच्या प्रयत्नात होत्या. याच दरम्यान, त्यांनी जुलै 2019 मध्ये एका वृत्तपत्रात कर्ज मिळण्याबाबत जाहिरात पाहिली. त्यामुळे त्यांनी यावर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला. तसेच, 2 लाख रुपये कर्ज पाहिजे असल्याची माहिती दिली. त्यावेळी आरोपीने वेगवेगळी कारणे सांगून त्यांना कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून 45 हजार रुपये उकळले. मात्र, त्यांना कर्ज दिले नाही. अधिक तपास येरवडा पोलीस करत आहेत.

सिंगापूरला नोकरीच्या बहाण्याने फसवणूक –

दोन तरूणांना सिंगापूर येथे मोठ्या पदावर नोकरी लावण्याचे अमिष दाखवून सायबर चोरट्यांनी साडे तीन लाख रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी अ‍ॅनी वेलंगणी (वय 34, रा. खडकी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींना व त्यांचा मित्र अमितकुमार सिंग याला सिंगापूर येथे नोकरी लावण्याचे अमिष दाखवून विश्वास संपादन केला. त्यासाठी काही पैसे लागतील असे सांगितले. त्यावेळी त्यांच्याकडून 3 लाख 45 हजार रुपये भरण्यास भाग पाडले. परंतु, त्यांना नोकरी लावली नाही. अधिक तपास खडकी पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –