पुण्यात ऑनलाईन शॉपिंगव्दारे 45 हजारांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –    सायबर गुन्ह्याचा आलेख वाढतच असून, पुन्हा एका नागरिकाच्या अमेझॉन अप हॅककरून क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाइन शॉपिंग करून 45 रुपयांना फसविल्याचे समोर आले आहे. ही घटना २५ मे यादरम्यान घडली आहे.

याप्रकरणी ४७ वर्षीय व्यक्तीने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात आयटी ऍक्ट व फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी एका खासगी कंपनीत नोकरीस आहेत. त्यांच्याकडे खासगी बँकेचे क्रेडिट कार्ड आहे. तसेच त्यांचे अमेझॉन अप देखील आहे. यादरम्यान २५ मे रोजी त्यांचे एका अनोळखी व्यक्तीने अमेझॉन अप हॅक केले. तसेच त्यानंतर क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती विचारुन ४५ हजारांची ऑनलाईन खरेदी केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. त्याची प्राथमिक चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अजय वाघमारे करीत आहेत.