डेबिट कार्डनं 161 रूपयांचं पेट्रोल भरलं अन् ‘गायब’ झाले 45000

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लष्कर भागातील हिंदुस्थान पेट्रोलियम पंपावर पेट्रोल टाकल्यानंतर डेबिट कार्डने पैसे भरले. मात्र, त्यानंतर दुसर्‍याच महिन्यात तरूणीच्या खात्यावरून तब्बल 45 हजार रुपये सायबर चोरट्यांनी ट्रान्सफरकरून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. नोव्हेंबर 2011 मध्ये हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पर्वती परिसरात राहणार्‍या 25 वर्षीय तरुणीने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, चौघाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या खासगी कंपनीत नोकरी करतात. दरम्यान, नोव्हेंबर 2019 मध्ये त्या कामानिमित्त लष्कर परिसरात आल्या होत्या. त्यांच्या दुचाकीत पेट्रोल कमी असल्याने त्यांनी येथील हिंदुस्थान पेट्रोलियम मे. रशिद खोडादाद अँड कंपनीच्या पेट्रोल पंपावर त्यांनी सायंकाळी 161 रुपयांचे पेट्रोल टाकले. 161 रुपये त्यांनी त्यांच्या डेबिट कार्डवरून दिले. त्या येथून निघून गेल्या. मात्र, दुसर्‍या महिन्यात म्हणजेत डिसेंबरमध्ये 14 आणि 17 तारखेला त्यांच्या खात्यावरून अज्ञातांनी एकूण 45 हजार 118 रुपये ट्रान्सफर करून त्यांची फसवणूक केली. त्यांना मोबाईलवर एसएमएस आल्यानंतर त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली होती. चौकशी करण्यात आली. चौकशीत आरोपींची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास लष्कर पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like