MD च्या अभ्यासक्रमाला प्रवेश देण्याच्या बहाण्याने 5 लाख रुपयांची फसवणूक !

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – एमडीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश देण्याच्या बहाण्याने पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात सतीश बाबुराव चांदेवार (वय ४०, रा. सोमेश्वरवाडी, पाषाण) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विनोद बेंबले (रा. बंगळुरु) नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनोद व फिर्यादी सतीश हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी यांच्या नातेवाईक असलेल्या एका तरुणाला एमडीला प्रवेश हवा होता. त्यासाठी ते प्रयत्न करत होते. त्यावेळी आरोपी बेंबले याने तरुणास गुलबर्गा येथील एका कॉलेजमध्ये एमडीला प्रवेश मिळवून देतो. त्या मेडिकल कॉलजेच्या चेअरमन माझे वडील असल्याचे सांगितले. तसेच त्यांचा विश्वास संपादन केला आहे. तसेच प्रवेशासाठी त्यांच्याकडून 5 लाख रुपये घेतले. मात्र, त्यानंतर कोणत्याही प्रकारचे त्यांना प्रवेश मिळवून दिला नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी 5 लाख दिलेले परत मागितले. मात्र, आरोपींना त्यांना पैसे परत दिले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. अधिक तपास चतुःश्रुंगी पोलिस करत आहेत.