सहलीच्या बहाण्याने 23 नागरिकांना सव्वा पाच लाखांना गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अंदमान-निकोबारमध्ये सहलीला घेऊन जाण्यासाठी 23 नागरिकांची सव्वा पाच लाखांना फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. 16 ऑगस्ट 2018 ते फेब्रुवारी 2020 कालावधीत घडली आहे. याप्रकरणी जेष्ठ नागरिकाने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, फसवणूकीसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेक्कन परिसरातील मॅझेनाईन फ्लोअरवर एका ट्रॅव्हल एजन्सीचे कार्यालय आहे. त्यांनी शहरातील 23 नागरिकांना अंदमान आणि निकोबारला सहलीसाठी घेउन जाण्याचे आश्वासन दिले. नागरिकांकडून प्रत्येकी 32 हजार रुपये आगाउ घेतले.

मात्र, काही दिवसांनी ट्रॅव्हल्स वैंपनीने नागरिकांना विमानाची तिकीटे मिळाली नसल्याचे सांगत पैसे परत न देता 5 लाख 28 हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी डेक्कन पोलिस अधिक तपास करीत आहेत.