Paytm कॉल सेंटरमधून बोलत असल्याचे सांगुन 50 हजाराची फसवणूक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – सायबर चोरट्यांनी पेटीएम कॉल सेंटरमधून बोलत असल्याचे सांगत एकाला 50 हजार रुपयाला गंडा घातल्याची घटना घडली.

याप्रकरणी 39 वर्षीय व्यक्तीने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कर्वेनगर भागात राहतात. मार्च महिन्यात त्यांना एका व्यक्तींने लिंक पाठवून यावर दिलेल्या क्रमांककावर फोन करण्यास सांगितले. त्यांनी फोन केल्यानंतर त्यांना पेटीएक कॉल सेंटरमधून बोलत असल्याचे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. तसेच बँक खात्याची गोपनिय माहिती मिळवून खात्यातून ऑनलाइन 50 हजार 998 रुपये ट्रान्सफर करून घेत फसवणूक केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) आर. आर. तातकरे हे करत आहेत.