अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संचालकांसारखा ‘फेक ईमेल’ वापरून 51 लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – प्रसिद्ध अशा सीओईपी संस्थेच्या डायरेक्टर यांच्या इमेलशी साधर्म्य असणारा इमेल तयार करून त्याद्वारे एका तरुणाला वेगवेगळी कारणे सांगून तब्बल 51 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. गेल्या वर्षी हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सचिन जाधव यांनी सायबर पोलीसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञात बँकेचे खातेधारक आणि वापरकर्ते यांच्यावर आयटी अ‍ॅक्ट व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन जाधव हे खासगी कंपनीत अंकाऊटंट म्हणून नोकरी करतात. दरम्यान, 8 ऑक्टोबर 2018 मध्ये त्यांना सीओईपी संस्थेच्या डायरेक्टर यांच्या इमेलशी साधर्म्य असणार्‍या इमेलवरून एक मेल आला. त्यांना त्यांना वेगवेगळ्या प्रोजेक्टबाबतची माहिती सांगण्यात आली. त्यांचा विश्वास संपादन करून केला. त्यानंतर त्यांना वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून केवळ 14 दिवसांमध्ये खासगी बँकांच्या खात्यावरून एकूण 51 लाख रुपये भरण्यास भाग पाडले. परंतु, त्यांना पैसे भरल्यानंतरही त्यांना सांगण्यात आलेले प्रोजेक्टबाबत इतर कोणतीही पुढील माहिती न देता त्यांना आणखी पैसे भरण्यास सांगण्यात आले. त्यावेळी त्यांना फसवणूक होत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली होती. सायबर पोलिसांकडे 2018 मध्ये हा तक्रार अर्ज आला होता. मात्र, पोलिसांनी या अर्जाची वर्षाहून अधिक काळ चौकशी केली. तसेच, त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचौरे हे करत असून, लवकरच गुन्ह्याची उकल होईल. चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, हे सायबर चोरटे पकडल्यानंतर अशा अनेक गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/