ट्रॅव्हल्स एजन्सीकडून स्वयंसेवी संस्थेची 7 लाखाची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  ऑस्ट्रेलियात होणाऱ्या लाईफ सेव्हिंग वर्ल्ड चॅम्पियनशीप २०१८ च्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १२ खेळाडूंचे ऑस्ट्रेलियाचे विमान तिकीट न काढता ट्रॅव्हल्स एजन्सी चालकाने एका स्वयंसेवी संस्थेची 7 लाखाला फसवणूक केली असल्याचा प्रकार समोर आला आहे. सप्टेंबर २०१८ ते मे २०२० कालावधीत या कालावधीत ही घटना घडली आहे.

याप्रकरणी सागर आखाडे (वय २७, रा. अशोकनगर, येरवडा) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वेलकम ट्रॅव्हल्स एजन्सीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर राष्ट्रीय लाईफ सेव्हिंग सोसायटीमध्ये प्रशासकीय व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. संबंधित संस्थेच्यावतीने लाईफगार्ड प्रशिक्षण, प्रथमोपचार, रेस्क्यू प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर जगभरात आयोजित स्पर्धांमध्ये खेळाडूंना पाठविण्यात येते. लाईफ सेव्हिंग वर्ल्ड चॅम्पियनशीप २०१८च्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १२ खेळाडूंना पाठवायचे होते. त्यासाठी वेलकम ट्रॅव्हल्स एजन्सीने संस्थेकडून ७ लाख १५ हजार रुपये घेतले. मात्र, खेळाडूंचे तिकीट न काढता फसवणूक केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) बळवंत मांडगे अधिक तपास करीत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like