फायनान्सचे कर्ज घेऊन घेतलेल्या कारची बनावट NOC द्वारे विक्री

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – फायनान्स कंपनीकडून कर्जाद्वारे खरेदी केलेली कार एकाने बीड आरटीओची एनओसी मिळवून विक्री करण्यात आल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. पण, त्याने बीड आरटीओची एनओसी कशी मिळविली त्यात कोण कोण सामिल आहे, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

याप्रकरणी दादा शेख (वय 40, रा. वाघोली) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रामवाडी भागात राहणार्‍या 30 वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रीराम फायनान्स कंपनीत कामाला आहे. त्याठिकाणी फिर्यादी हे मॅनेजर आहेत. दरम्यान यातील आरोपी फिर्यादींच्या कंपनीमधून 2011 ला 6 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाच्या पैशांतून त्याने तवेरा कार घेतली. काही महिने त्याने हप्तेही भरले. मात्र, त्यानंतर कर्जाची परतफेड केली नाही. त्यामुळे कंपनीने त्याची कार जप्त केली होती. मात्र, आरोपीने बीड आरटीओमधून बनावट एनओसी काढले आणि ती कार परस्पर विक्री केल्याचे समोर आले आहे. अधिक तपास चंदननगर पोलीस करत आहेत.