Pune : दुसर्‍याच्याच नावाने 4.75 लाखाचे ऑनलाइन कर्ज घेवून फसवणूक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – अ‍ॅक्सिस बँकेच्या कस्टमर केअर ऑफिसमधून बोलत असल्याची बतावणी करुन सायबर चोरट्याने तरुणाच्या नावे ४ लाख ६३ हजारांचे ऑनलाईन कर्ज घेउन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी मालोजी विठ्ठल नवले (वय २८, रा. गोखलेनगर) यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालोजी एका खासगी कंपनीत
नोकरीस आहेत. गोखलेनगर येथे राहतात. २५ ते २७ जुलैदरम्यान सायबर चोरट्याने त्यांना फोन केला. अ‍ॅक्सिस बँकेच्या कस्टमर केअर सेंटरमधून बोलत असल्याचे सांगितले. त्यांना बँकखात्याचे स्टेटमेंट पाठवून देण्याचे सांगत एक लिंक पाठवून माहिती भरून घेतली. त्यानुसार मालोजी यांनी माहिती भरून पाठविली असता, सायबर चोरट्याने त्यांच्या नावे ४ लाख ६३ हजारांचे कर्ज मंजूर करुन घेत स्वतःच्या बँकखात्यात वर्ग करुन घेतले. बँकेकडून कर्ज स्वीकारल्याचा मेसेज आल्यानंतर मालोजी यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. अधिक तपास चतुःशृंगी पोलिस करीत आहेत.