Pune : KYC अपडेटच्या बहाण्यानं महिलेची 1 लाख 8 हजारांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   केवायसी अपडेट करण्याचा बहाणाकरून सायबर चोरट्यांनी महिलेच्या खात्यामधून 1 लाख 8 हजार रुपये ट्रान्सफर करत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या महिन्यात हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी 68 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना गेल्या महिन्यात 18 जुलै रोजी एका व्यक्तीने फोन केला व राहुल बोलत असल्याचे सांगितले. तसेच पेटीएमचे केवायसी अपडेट करायचे आहे असे सांगून त्यांना गोड बोलत विश्वास संपादन केला. त्यानंतर अपडेट झाल्याचे सांगत क्विक सपोर्ट अप डाउनलोड करण्यास सांगितले. त्यांनी हे अप घेतल्यानंतर त्यांना पत्नीच्या मोबाईलमध्ये एसएमएस टू फोन हे अप घेण्यास सांगितले. यानंतर या चोरट्यांने फिर्यादी व त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यामधून 1 लाख 8 हजार रुपये ट्रान्सफर करून त्यांची फसवणूक केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) चव्हाण हे करत आहेत.