Pune : विदेशी चलन खरेदी प्रकरणी नारायण पेठेतील दोघांना अटक, लाखो रूपयांची फसवणूक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – विदेशी चलन खरेदीसाठी नागरिकांना जादा परतावा देण्याच्या आमिषाने दाम्पत्याने लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात एका नेव्हीमधून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याच्या पत्नीची देखील फसवणूक झाली आली आहे.

याप्रकरणी अभिजीत व प्रज्ञा कुलकर्णी (दोघेही रा. नारायण पेठ) यांना अटक केली आहे. याबाबत शुभांगी मनोहरन (वय ५३, रा. पाषाण) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलकर्णी दाम्पत्याची वेल्थप्लॅनेट कंपनी आहे. त्याद्वारे त्यांनी २०१८ पासून नागरिकांना विदेशी चलनाच्या ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतविल्यास एका वर्षांत दामदुप्पट देण्याचे आमिष दाखविले होते.

शुभांगी यांनी विश्वास ठेउन वेल्थप्लॅनेट कंपनीत ४८ लाख ९२ हजार रुपये गुंतविले. त्यानंतर काही महिन्यांनी त्यांनी कुलकर्णी यांना पैसे मागितले. पण त्यांना केवळ १ लाख ६२ हजारांचा परतावा कंपनीकडून देण्यात आला. उर्वरित ४७ लाख ३० हजार रुपये न देता फसवणूक केली आहे. त्याशिवाय आणखी काही लोकांची फसवणूक झाल्याची शक्यात पोलिसांनी वर्तविली आहे.