पुण्यात फ्लॅट धारकांची फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डरविरूध्द FIR

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – करारा प्रमाणे अटी-शर्थी न पूर्ण करता सदनिकेचा ताबा तसेच सुविधा न देता 11 सदनिका धारकांची 22 लाख 45 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रसाद मोकाशी (रा. धानोरी) याच्यावर विमानतळ पोलीस ठाण्यात फसवणूक, महाराष्ट्र फ्लॅट ओनरशिप ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महेंद्र महाजन (वय 38, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. हा सर्व प्रकार 2011 ते 2020 या कालावधीत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे डिझाइन इंजिनिअर आहेत. दरम्यान त्यांना फ्लॅट घ्यायचा होता. त्याचवेळी बांधकाम व्यावसायिक प्रसाद मोकाशी यांची विमानतळ येथील लोहगाव गाव येथे बहुमजली प्रकल्प सुरू होता. त्यात फिर्यादी यांनी फ्लॅट घेण्याबाबत चौकशी केली. त्यांना फ्लॅट आवढल्याने त्यांनी येथे फ्लॅट घेण्याचे ठरविले. त्यांच्यासोबत आणखी 10 व्यक्तींनी येथे फ्लॅटची बुकिंग केली.

तसेच पहिली रक्कम देखील भरली. यावेळी त्यांचा फ्लॅट घेण्याबाबतचा करार झाला होता. कराराप्रमाणे 24 महिन्याच्या आता सर्व सुविधा युक्त फ्लॅट देणे बंधनकारक होते. परंतु बांधकाम व्यावसायिक मोकाशी यांनी 24 महिन्यात त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही. तसेच कोणत्याच सुविधा देखील दिल्या गेल्या नाहीत. त्यांनी काही दिवस वाठ पाहिली. पण त्यांना फ्लॅट मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. त्याची प्राथमिक चौकशी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास विमानतळ पोलीस करत आहेत.