Pune : 72 व्या वर्षी सीमकार्ड अपग्रेड करणं पडलं एक लाखाला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  सीमकार्ड अपग्रेड करण्याच्या बहाण्याने जेष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांनी एक लाखांचा गंडा घातला.

याप्रकरणी ७२ वर्षीय जेष्ठ नागरिकाने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जेष्ठ नागरिक एरंडवण्यात राहायला आहेत. काही दिवसांपुर्वी सायबर चोरट्याने त्यांना फोन करुन सीमकार्ड अपग्रेड करण्याचे सांगितले. त्यानुसार चोरट्यांनी जेष्ठ नागरिकाचा विश्वास संपादित करुन बँकखात्याची गोपनीय माहिती विचारुन घेतली. त्यानंतर ऑनलाईनरित्या १ लाख रुपयांची फसवणूक केली. अधिक तपास उपनिरीक्षक शिवाजी काटे करीत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like