Pune Cheating Fraud Case | मोठा परतावा देण्याच्या आमिषाने 13 जणांची 17 कोटींची फसवणूक, बिबवेवाडी परिसरातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Cheating Fraud Case | कंपनीत गुंतवणुक करण्यास भाग पाडून गुंतवणुकीवर मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून 13 जणांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर कोणताही परतावा न देता 17 कोटी 35 लाखांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) एकावर एमपीआयडी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Cheating Fraud Case)

याबाबत बिबवेवाडी येथे राहणाऱ्या एका महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन संदीपकुमार भगवानदास गुप्ता Sandeepkumar Bhagwandas Gupta (वय-35 रा. गणेशनगर, भिवंडी, ठाणे) याच्यावर आयपीसी 409, 420, 406 सह सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम (MPID Act) कलम 3 व 4 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सप्टेंबर 2022 पासून आजपर्यंत बिबवेवाडी येथील शुभ मॅनेजमेंट सर्व्हिसेस येथे घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या शुभ मॅनेजमेंट सर्व्हिसेस व स्विच पे सोल्युशन प्रा. लि. या दोन कंपन्या आहेत. या माध्यमातून पेमेंट एग्रीगेटर व रिसेलरचा व्यवसाय करतात. आरोपी गुप्ता याने फिर्यादी यांना कंपनीत गुंतवणुक करण्यास भाग पाडून मोठ्या परताव्याचे आमिष दाखवले. गुप्ता याने फिर्यादी यांच्यासह 13 जणांचा विश्वास संपादन केला.

आरोपी गुप्ता याने 13 जणांकडून 17 कोटी 35 लाख रुपये घेतले. सुरुवातीला काही दिवस गुंतवणुकीवर परतावा दिला.
मात्र, त्यानंतर परतावा दिला नाही. गुप्ता याने फिर्यादी यांच्यासह इतरांनी दिलेली रक्कम वैयक्तिक फायद्यासाठी वापरली.
तसेच एग्रीगेटर व्यवसाय न करता 13 जणांनी गुंतवलेली रक्कम तसेच परतावा न देता आर्थिक फसवणूक केली.
याबाबत फिर्यादी यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली.
पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे : सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

मारहाण करुन अल्पवयीन मुलीवर बलात्कार, चंदननगर परिसरातील घटना

Raj Thackeray-Manohar Joshi | मनोहर जोशींच्या निधनानंतर राज ठाकरेंचा शोकसंदेश, ”शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदावर बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न…”

Maharashtra IAS Transfers | राज्यातील 12 सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्या ! कविता व्दिवेदी यांची पुण्याच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त पदी नियुक्ती तर पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या संचालकपदी कार्तिकी एन एस यांची नियुक्ती

Pune Bibvewadi Crime | पुणे : सिनेस्टाईल पाठलाग करुन तरुणावर धारदार हत्याराने वार, दोन सराईत गुन्हेगारांवर FIR