Pune Cheating Fraud Case | खोटे खरेदीखत करुन फ्लॅट न देता केली फसवणूक; तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

पुणे : फ्लॅट विकत देत असल्याचे भासवून खरेदीखत करुन दिले. त्याबदल्यात १९ लाख ५० हजार रुपये घेऊन फसवणूक (Pune Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत दिनेश बबन गुप्ता (वय ३८, रा. माळवाडी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३३८/२४) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सचिन दत्तात्रय वटारे, गणेश दत्तात्रय वटारे, सायली दत्तात्रय वटारे (सर्व रा. गणेशनगर, घोरपडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार हडपसरमधील गोपाळपट्टी येथील आर व्ही व्हिजनमध्ये २०१९ ते २०२३ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी यांना फ्लॅट देण्याचा बहाणा केला. त्यांच्याकडून ऑनलाईन व रोख स्वरुपात एकूण १९ लाख ५० हजार रुपये घेतले. फिर्यादीच्या नावे खरेदीखत करुन दिले. मात्र त्यांना फ्लॅट दिला नाही. तेव्हा त्यांनी खरेदीखताची तपासणी केल्यावर तो बनावट असल्याचे दिसून आले. आपली फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

रिक्षाचालकाने रिक्षासह पळून जाताना पोलीस कर्मचाऱ्याला फरफटत नेले

पत्नीबाबत अपशब्द बोलणे भोवले ! नर्‍हेच्या डोंगराजवळ तरुणाचा खून, सराईत गुन्हेगाराला अटक

पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला भोसरी पोलिसांकडून अटक