Pune Cheating Fraud Case | पुणे : PF कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकाची 10 लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Cheating Fraud Case | भविष्य निर्वाह निधी कार्यालय (PF Office) दिल्ली येथून बोलत असल्याचे सांगून एका 71 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची 10 लाख 15 हजार 504 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार जुलै 2023 ते 2 जानेवारी 2024 या कालावधीत ऑनलाईन (Online Fraud Case) घडला आहे.

याप्रकरणी जयंत गोविंद झेंडे (वय-71 रा. डहाणुकर कॉलनी, कोथरुड) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात (Alankar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार वंशिका गुप्ता असे नाव सांगणाऱ्या महिलेवर तसेच तिच्या इतर साथीदारांवर आयपीसी 419, 420, 34 सह आयटी अॅक्ट (IT Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे.(Pune Cheating Fraud Case)

पोलिसांनी दिलेल्य माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) फिर्यादी यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. समोरच्या व्यक्तीने वंशिका गुप्ता असे नाव सांगून प्रॉव्हिडंट फंड ऑफिस नवी दिल्ली येथून बोलत असल्याचे सांगितले. फिर्यादी यांना 2012 पासून ग्रुप विमा थकीत असल्याचे सांगून फायनान्स ऑफिसर रवी नायक यांनी तुमचा मोबाईल क्रमांक देऊन संपर्क करण्यास सांगितले आहे, असे फिर्याद यांना सांगण्यात आले. रवी नायक याने वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादी यांना बँक खात्यावर पैसे भरण्यास सांगितले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर जयंत झेंडे यांनी अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरेखा चव्हाण (PI Surekha Chavan) करीत आहेत.

केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने फसवणूक

पुणे : बँक खाते केवायसी अपडेट (KYC Updates) करण्याच्या बहाण्याने सायबर गुन्हेगारांनी वानवडी (Wanwadi)
येथील एका 38 वर्षीय महिलेची 3 लाख 15 हजार रुपयांची फसवणूक केली.
याप्रकरणी महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्य़ाद दिली आहे.
हा प्रकार 3 नोव्हेंबर 2023 ते 11 एप्रिल 2024 या कालावधीत गणपती चौक, विमाननगर येथे घडला आहे.
आरोपींनी महिलेकडून ओटीपी घेऊन आर्थिक फसवणूक केली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन भोसले (PSI Chetan Bhosale) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri PMPML Bus Accident | पिंपरी : पीएमपीएमएल बसच्या धडकेत मजुराचा मृत्यू

Jayant Patil On BJP | पवारसाहेब भाजपसोबत जाण्यास तयार नव्हते, हीच ‘त्या’ नेत्यांची अडचण होती, जयंत पाटलांचे प्रत्युत्तर