Pune Cheating Fraud Case | पुणे : कंपनीचे भागीदारी शेअर्स देण्याच्या बहाण्याने 87 लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Cheating Fraud Case | हॉटेलच्या कंपनीचे भागीदारी शेअर्स देतो असे सांगून 87 लाख 47 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सन 2021 ते 2022 या कालावधीत राजाबहादुर मिल येथील हॉटेल बोटॉनिका ग्रीनबार अँड रेस्टोरंट येथे घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत कोमल प्रकाश गुडदे (वय-32 रा. एनआयबीएम मोहंम्मद वाडी रोड, कोंढवा) यांनी बंडर्गाडन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन सुजान संपत केदारे (वय-34 रा. लिबुंनी पार्क, येरवडा, पुणे) याच्यावर 406, 419, 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने त्यांच्या हॉटेल Peacemeal Hospitality LLP या कंपनीत भागीदारी शेअर्स देण्याचे आश्वासन फिर्यादी यांना दिले. (Pune Cheating Fraud Case)

याबाबत आरोपीने फिर्यादी यांच्या सोबत करार केला. शेअर्स देण्याच्या बहाण्याने आरोपीने फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी 87 लाख 47 हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर आरोपीने बोटॉनिक ग्रीनबार अँन्ड रेस्टॉरंट हॉटेल कंपनीचे शेअर्स दिले नाहीत. आरोपीने फिर्यादी यांच्याकडून घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणूक केली. याबाबत फिर्यादी यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. या अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी सोमवारी (दि.26) गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गावडे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis | मनोज जरांगे पुन्हा संतापले, ”देवेंद्र फडणवीस हे मुद्दाम करतायेत, तुम्ही सगळ्यांनी शांत राहा”

SIT Investigate Manoj Jarange Movement | मोठी बातमी! भाजपाच्या मागणीनंतर मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी, विधानसभा अध्यक्षांचे आदेश

FIR On Congress Workers In Pune | पुण्यात पंतप्रधानांचा पुतळा जाळल्या प्रकरणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल (Video)

Maratha Reservation Andolan | मराठा आरक्षण आंदोलन : 3 जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंदमुळे 100 कोटींचा फटका