Pune Cheating Fraud Case | ज्येष्ठ दाम्पत्याची 60 लाखांची फसवणूक, 6 जणांवर MPID

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Cheating Fraud Case | गुंतवणुक केलेल्या रक्कमेवर एक टक्का परतावा देण्याचे आमिष दाखवून सहा जणांनी एका ज्येष्ठ दाम्पत्याला साठ लाखांचा गंडा घातला. हा प्रकार 2008 मध्ये औंध येथील परिहार चौकात घडला. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी (Chaturshringi Police Station) सात जणांवर MPID अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Pune Cheating Fraud Case)

याप्रकरणी बाणेर लिंक रोड येथे राहणाऱ्या 71 वर्षीय ज्येष्ठ महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.15) फिर्याद दिली आहे. यावरुन द्वारका नारायण जालान (एचयूएफ), सदस्य सुधा द्वारका जालान, विजय जालान, संजय जालान, समीर जालान, प्रिया जालान (सर्व रा. दामोदर व्हिला, भंडारकर रोड, पुणे) यांच्यावर आयपीसी 406, 420, 34 सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम (MPID Act) कलम 3 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांच्याकडे केंद्र सरकार तसेच राज्य सरकार तसेच आरबीआय यांच्याकडील
गुंतवणूक बाबतचा कोणताही परवाना नव्हता. असे असताना आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी व त्यांच्या पतीचा
विश्वास संपादन केला. आरोपींनी त्यांना गुंतवणुकीचे आमिष दाखवून गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर एक टक्का व्याज
देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार फिर्यादी व त्यांच्या पतीने 60 लाख रुपये आरोपींना दिले. मात्र, आरोपींनी पैसे घेतल्यानंतर कोणत्याही प्रकरचा परतावा अथवा मुळ रक्कम परत न करता आर्थिक फसवणूक केली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC News | पुणे महापालिका आयुक्तांनी कामांच्या वर्क ऑर्डर देण्याची मुदत सात मार्चपर्यंत वाढविली

Pune PMC-Abhay Yojana 2024 | ओपन प्लॉट्सच्या मिळकतकर थकबाकीदारांसाठी अभय योजना आणण्याचा अद्याप निर्णय नाही – महापालिका आयुक्त विक्रम कुमार

NCP Leader Ajit Pawar | ”संपूर्ण परिवार विरोधात गेला तरी जनता माझ्यासोबत”, अजित पवारांचे भावनिक आवाहन, सुप्रिया सुळेंवर केली टीका…

Sena Kesari 2024 In Pune | पुणे: हडपसरमध्ये रंगला राज्यस्तरीय सेना केसरी कुस्तीचा महासंग्राम (Video)