पुण्यातील ATM केंद्रात फवारणी करण्याच्या बहाण्याने अकाऊंटमधून 10 हजार काढले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – एटीएम केंद्रात धूर फवारणीकरून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला बाहेर थांबण्यास सांगत दोघांनी खात्यातून 10 हजार रुपये लांबविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी 84 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघा अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्येष्ठ नागरिक येरवडा भागातील शास्त्रीनगर येथे असलेल्या एका बँकेच्या एटीएम केंद्रात गेले होते. त्यांच्या मागे दोन चोरटे थांबले होते. पैसे काढत असताना मागे थांबलेल्या चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाकडे बतावणी केली. एटीएम केंद्रात धूर फवारणी करायची आहे, अशी बतावणी केली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक एटीएम यंत्रातून कार्ड काढण्यास विसरले व ते एटीएम केंद्राच्या बाहेर थांबले. चोरट्यांनी एटीएम केंद्रात धूर फवारणीचा बहाणा केला. त्यांच्या खात्यातून 10 हजारांची रोकड लांबवून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले तपास करत आहेत.

पादचारी महिलेचे दागिने हिसकावले
पादचारी महिलेचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना कात्रज-कोंढवा रस्त्यावर घडली. याबाबत 30 वर्षीय महिलेने भारती विद्याापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला कात्रज-कोंढवा रस्त्यावर राहायला आहे. शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास ती शिवशंभोनगर भागातून निघाली होती. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ३५ हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले.