ATM च्या PIN व्दारे 25 हजाराची फसवणूक

पिन क्रमांक चोरून पाहिला अन 25 हजार काढून घेतले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पैसे काढताना पिन क्रमांक चोरून पाहिल्यानंतर हातचालीकीने कार्डची अदलाबदल करून खात्यावरून 25 हजार काढून फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी 50 वर्षीय महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, 25 ते 30 वयोगटातील व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार 5 फेब्रुवारी 2020 रोजी घडला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुक्रवारी पेठेत राहण्यास आहेत. त्यांना पैशांची आवश्यक्ता होती. त्यामुळे त्या नाना पेठेतील एका एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. त्या पैसे काढत असताना तेथे उभा असणार्‍या व्यक्तीने त्यांचा पिन क्रमांक चोरून पाहिला. त्यानंतर हातचालाकीने एटीएम कार्ड अदलाबदली केले. तसेच, त्यांच्या खात्यावरून 25 हजार रुपये काढून त्यांची फसवणूक केली. अधिक तपास समर्थ पोलीस करत आहेत.

You might also like